Psalms 2

1राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत,

आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
2पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषित्काविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत,
आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
3चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या.
आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.

4परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल,

प्रभू त्यांचा उपहास करणार.
5तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल
आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करीन.

6मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.

7मी परमेश्वराची फर्मान घोषीत करीन,
तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.”
या दिवशी मी तुझा बाप झालो आहे.

8मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.

9लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील,
कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.

10म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा;

पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
11भय धरून परमेश्वराची स्तुती करा
आणि थरथर कापून हर्ष करा.

आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी त्याच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही.

कारण त्याचा क्रोध त्वरीत पेटेल.
जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
12

Copyright information for MarULB